महाराष्ट्र
ब्रेकिंग! वाईन शॉप चालकांना दणका

- राज्यातील अनेक शहरांत आपल्याला गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बिअर किंवा दारुचे दुकान दिसून येते.
- पण आता या दारू विक्री दुकानांच्या संदर्भात राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत या संदर्भातील घोषणा केली आहे.
- अजितदादा म्हणाले, राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बिअर किंवा दारुचं दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बिअर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही.
- दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही अजितदादा म्हणाले.