सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! खून का बदला खून

- सोलापूर : सहा वर्षांपूर्वी आपल्या भावाचा खून केल्याचा राग मनात धरून एकाने आपल्या भावाचा खून केलेल्या तरुणाचा नियोजनबद्ध काटा काढला. ही घटना (दि.10) मार्चला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास उद्धव महाराज सरवदे यांच्या घराशेजारी जोशी गल्ली, रविवार पेठ येथे घडली.
- याप्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. तुकाराम उर्फ रॉबट पांडुरंग सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यात विष्णू पांडुरंग सरवदे (वय-36, रा.जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी उत्तम प्रकाश सरवदे (रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- यात मिळालेली माहिती अशी की, यातील फिर्यादी विष्णू सरवदे याचा भाऊ मयत तुकाराम उर्फ रॉबट सरवदे याने 2019 मध्ये संशयीत आरोपी उत्तम सरवदे याचा भाऊ सागर सरवदे याचा खून केला होता. त्याच खुनाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने 10 मार्चला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास यातील संशयित आरोपीने त्याच्या घरासमोर उत्तम सरवदे याला मारहाण करून गंभीर जखमी केले. मयत तुकाराम सरवदे याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आठ तासात जेरबंद शहरातील रविवार पेठेतील जोशी गल्ली येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आठ तासात जेरबंद करण्यात जोडभावी पेठ पोलिसांना यश आले. यातील संशयित आरोपी उत्तम प्रकाश सरवदे (वय 35, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी गुप्त बातमीदाराद्वारे गुन्ह्यातील फरार आरोपीची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी राहण्यास असलेल्या इसमाकडे चौकशी करून गोपनीय बातमी मिळवून तांत्रिक पद्धतीचा वापर करून सदर आरोपीस गुन्हा घडल्यापासून आठ तासात आरोपीला जेरबंद केले आहे.