सोलापूर! तुला मुल होत नाही, तुझ्यात काहीतरी दोष आहे, असे म्हणत रूपालीचा भयंकर छळ

Admin
1 Min Read
  • सोलापूर : माहेरून पैसे घेऊन ये. तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. तुला मुल होत नाही, तुझ्यात काहीतरी दोष आहे. तू मला सोडचिट्ठी दे असे म्हणत विवाहितेला मारहाण करून तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात पती विशाल, सासरा हिरालाल, सासू शशिकला (रा. लाला नगर) ननंद श्रद्धा गुंजाळ, महादेव घोडके (रा.बत्तुल नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
  • या घटनेतील पीडित रूपाली विशाल लिंबोळे (वय-23,रा. हेमगिरी नगर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी रूपाली यांना 20 जून 2021 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान सासरी सासरच्या मंडळींनी त्रास दिला. फिर्यादी या सासरी नांदताना सासरच्या मंडळाकडून वारंवार पैशाची मागणी होत होती. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी करत होते. फिर्यादीला शिल्लक राहिलेले अन्न खाण्यास देऊन त्रास देत छळ करीत होते .शारीरिक व मानसिक आर्थिक त्रास देऊन घरातन हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Share This Article