खेळ
ब्रेकिंग! चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द

- यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने काल आपले नाव कोरले. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विजेत्या भारतीय संघाच्या खुल्या बस परेडचे नियोजन सध्या तरी नसल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
- दरम्यान बीसीसीआयने बस परेडचे नियोजन रद्द केल्यामुळे भारतीय संघाचे खेळाडू स्वतंत्रपणे आपापल्या घरी परतणार आहेत. बीसीसीआयने बस परेड का रद्द केली, याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस परेड रद्द करण्यात आली आहे.