सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूरला अवकाळी पावसाचा दणका

सोलापुरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.
दुसरीकडे, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बीड- पुणे महामार्गावरील निर्गुडी गावाजवळ झाडे उन्मळून पडल्याने महामार्ग बंद झाला.
तर नाळवंडीमध्ये आठ ते दहा घरांची पडझड झाल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय. त्याचबरोबर गावामधील जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पडले आहे. विद्युत पोलच्या तारा खाली आल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
दरम्यान सांगलीत हीआज वळीव पावसाने हजेरी लावली असून गारपीटसह जोरदार पाऊस यावेळी झाला. झाडेही यावेळी काही ठिकाणी उन्मळून पडली आहेत.