क्राईम
मध्यरात्री मोठा थरार

मुंबईत भायखळा येथे काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा तालुकाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. काही जणांनी त्यांच्यावर हल्ला करून धार धार शस्त्राने वार करून हत्या केली. तालुकाध्यक्षांना दवाखान्यात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली. ही घटना भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागे रात्री १२ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात सचिन हे गंभीर जखमी झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १२ वाजता सचिन हे भायखळा येथील म्हाडा कॉलनी येथे गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी सचिन यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कुर्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने त्यांच्या गाडीतून जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कुर्मी यांचा मृत्यू झाला होता.