हवामान

महाराष्ट्रात उष्णतेची लाट

सध्या सोलापूर शहर व परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे. राज्यात येत्या पाच दिवसांत तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे.

कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे,.तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button