महाराष्ट्र

ब्रेकिंग! फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचा कधी मिळणार?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी महिन्यातील हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. पैसे जमा झाल्याचे मेसेज महिलांना येत आहेत. यानंतर मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

या योजनेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतील तीन हजार रुपये एकत्रित देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हप्त्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात शुक्रवारी सायंकाळपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आता मार्च महिन्याचे पैसे केव्हा मिळणार याची माहिती मंत्री तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक १२ मार्चपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे !,अशी माहिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

Related Articles

Back to top button