खेळ

रोहित शर्मा आऊट होताच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

  • चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच हा सामना सुरु असतानाच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनानेही परप्रांतीय कामगारांना चांगलाच दणका दिला.
  • टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू असताना भारत विरोधी घोषणा दिल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागातील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाडली आहेत. नागरिकांनी या कारवाईला पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केले आहे.
  • काल मॅच सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर मालवण आडवण भागातील भंगार व्यवसायिकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या विरोधात मालवणमधील संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय रॅली काढली होती. यावरून मालवणमध्ये वातावरण तापले होते. प्रशासनाने या विरोधात पाऊल उचलत संबंधितांची अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.

Related Articles

Back to top button