खेळ
ब्रेकिंग! विराट कोहली पुन्हा नडला; ऑस्ट्रेलियाचा पराभव

- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने धुव्वा उडवत फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये गाठले. पाकिस्तानविरुद्ध शतकीय खेळी करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 84 धावांची शानदार खेळी करत तो विजयाचा हिरो ठरला.
- प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल आठ धावांवर बोल्ड झाला. त्याला बेन द्वारशुइसला बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही 28 धावा करून बाद झाला. कूपर कॉनोलीच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्नात तो एलबीडब्लू झाला. रोहितने डीआरएस घेतला. पण उपयोग झाला नाही. 43 धावांवर दोन विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर ही जोडी चांगली खेळ करत धावा करत होती. परंतु श्रेयस अय्यरला झम्पाने क्लिन बोल्ड करून ही भागिदारी तोडली. कोहली आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी केली. श्रेयसने 62 चेंडूत 45 धावा केल्या. विराट कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या अक्षर पटेल चांगली फलंदाजी करत होतो. पण नॅथन एलिसने त्याला बोल्ड केले. अक्षरने 30 चेंडूत 27 धावा केल्या. 35 ओव्हरमध्ये 178 धावांवर भारताच्या चार विकेट्स पडल्या. अर्धशतक झळकविणाऱ्या कोहलीला साथ देण्यासाठी के. एल. राहुल हा मैदानात आला होता.
- राहुल जोरदार फटकेबाजी करत होता. परंतु विराट कोहली हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला झम्पाने बाद केले. कोहलीने 98 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याने चार चौकार मारले. त्यानंतर फलंदाजीला आलेला हार्दिक पंड्याने के. एल. राहुलला चांगली साथ दिली. पण विजय जवळ आला असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात पंड्या बाद झाला. त्याने 24 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि एक चौकार मारला. के. एल. राहुलने षटकार खेचत विजय मिळवून दिला.