क्राईम
नराधम दत्तात्रय गाडेबाबत पुणे पोलीसांचा मोठा निर्णय

- स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडे याने महिला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडले असल्यास त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
- दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
- स्वारगेट स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास पिडीत तरुणीला ताई म्हणून तसेच वाहक असल्याची बतावणी करून एका उभा असलेल्या शिवशाहीत नेहून अत्याचार केल्याची घटना घडली. जीवे मारण्याची धमकी देऊन दोनदा अत्याचार केला. घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी या नराधम गाडेला गुनाट या त्याच्याच गावातील शेतातून पकडले. गाडेवर यापूर्वी महिलांना लुटल्याचे ५ गुन्हे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर येथे दाखल आहेत.



