खेळ

टीम इंडियाच्या विजयामुळे यजमान पाकिस्तानला तगडा झटका

  • भारतीय संघाने काल दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयसह एकूण पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले. ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. मात्र त्याचा फटका हा यजमान आणि शेजारी पाकिस्तानला बसला आहे.
  • पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र, भारतीय संघाने या स्पर्धेत सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत आपले सामने खेळले. भारतीय संघाने एकूण चार सामने दुबईत खेळले. तर आता उपांत्य फेरीतील दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे.
  • तसेच दुसऱ्या बाजूला टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचल्याने पाकिस्तानला आर्थिकरित्या नुकसान झाले आहे. जर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव झाला असता तर अंतिम फेरीतील सामना हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार होता. त्यामुळे यजमान पाकिस्तानचे या सामन्याच्या निकालाकडे लक्ष होते. मात्र टीम इंडियाने विजय मिळवल्याने आता अंतिम फेरीतील सामना हा दुबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आजचा उपांत्य सामना हा पाकिस्तानमधील ‘अंतिम’ सामना असणार, हे स्पष्ट झाले आहे. 

Related Articles

Back to top button