खेळ
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात भूकंप

- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये काल भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या परभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने मोठा निर्णय घेत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. आता तो ऑस्ट्रेलियासाठी फक्त कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. याचबरोबर त्याची इच्छा 2028 च्या ऑलिंपिकमध्येही देशासाठी खेळण्याची आहे.
- याबाबत माहिती देत हा एक उत्तम प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला आहे, असे स्मिथने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2027 च्या विश्वचषकाची टीम तयार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे देखील स्मिथ म्हणाला. याचबरोबर कसोटी क्रिकेट हे प्राधान्य राहिले आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि मायदेशात होणाऱ्या एशेजची वाट पाहत आहे, असे या प्रेस रिलीजमध्ये स्मिथने म्हटले आहे.
- दरम्यान स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 169 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 153 डावांमध्ये त्याने 5727 धावा केल्या आहेत. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 87.13 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके आणि 34अर्धशतके आहेत.



