राजकीय
अजित पवार गटात खळबळ!

- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विविध कारणास्तव चर्चेचे कारण ठरत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. तर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजितदादा पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडले आहेत. देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा अजितदादा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
- दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एका बड्या मंत्र्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पालकमंत्री पदाचे वाटप होताना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आले होते. मुश्रीफ हे मूळचे कोल्हापूरातील कागल येथील आहेत, त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद त्यांना मिळावे, यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती.
- मात्र त्यांना कोल्हापूरपासून सहाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. हे पद मिळाल्यानंतर मुश्रीफ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते भाजपसह आपल्याच पक्षश्रेष्ठींविरोधात नाराज होते. अखेर आज त्यांची नाराजी उफाळून आली. मुश्रीफ यांनी वाशीमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर ते वाशिममध्ये सहाशे किलोमीटरहुन अधिक अंतर आहे. त्यांना प्रवासासाठी हा जिल्हा अडचणीचा ठरत आहे, याच कारणातून त्यांनी हे पालकमंत्रीपद सोडल्याची माहिती समोर येत आहे.