उच्चशिक्षित लेकीचा गावातल्या तरुणासोबत पळून प्रेमविवाह

एका गावात उच्चशिक्षित मुलीने प्रेमविवाह केल्याने नैराश्यातून आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय मुलीने गावातीलच एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केल्यानंतर आलेल्या नैराश्यातून तिच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली.
सातारा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती रात्री अचानक घरातून बेपत्ता झाली. यामुळे घरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती एका युवकासोबत पळून गेल्याची चर्चा गावात सुरू झाली. हे समजताच आईला जबर मानसिक धक्का बसला आणि नैराश्यातून पहाटे विषारी औषध प्राशन केले.
पोलिस तपासात समोर आले की, मुलीचे युवकासोबत सहा महिन्यापासून प्रेमसंबंध होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप विवाह केला होता. घरच्यांना न सांगता ती घरातून निघून गेली, हे आईला सहन झाले नाही. घरगुती तणाव, सामाजिक दबाव आणि मानसिक ताण यामुळे आईने टोकाचे पाऊल उचलले.



