महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात खळबळजनक घडामोड

  1. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काही दहशतवादी घुसल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील काऊंटरवर बंदूकीचा धाक दाखवून अरेरावी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना बाहेर काढण्यात येत आहे. रुग्णांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन तासासाठी कमला नेहरू रुग्णालय बंद करण्यात आले आहे. पुढील सर्व तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.
    पुण्यातील कमला नेहरू या महापलिकेच्या रुग्णालयात सकाळी तीन दहशतवादी घुसले असल्याचा फोन पोलिसांना आला. 
  2. खबरदारी म्हणून पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पथक दवाखान्यात पाठवले. या दवाखान्यात तिघे बांग्लादेशी घुसले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक दवाखान्यात पोहोचल्यावर अनेकांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी संशयित असलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. 

Related Articles

Back to top button