स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय सैन्यातील कॅप्टन शहीद झाले आहे. तर, चार दहशतवाद्यांना ठार झाल्याचेही शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहीद झालेले कॅप्टन 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. सध्या घटनास्थळी दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. असून, लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून भारतीय सैन्याने परिसरातून एक एम चार रायफल, कपडे आणि तीन बॅगा जप्त केल्या आहेत.
सुरक्षा दलांना जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील पटनीटॉप आणि डोडा जिल्ह्यातील असर या सीमेवरील जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर काल संध्याकाळपासून या ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान दहशवादी आणि सैन्यदलात चकमक झाली. त्यात भारतीय लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन शहीद झाला आहे.
अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन शहीद

कॅप्टन दीपक हे आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतामातेने आपला पुत्र गमावला आहे. दहशवाद्यांशी गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते. तर, चार दहशतवादी मारले गेल्याची शक्यता सैन्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जवानांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातून एक एम-4 रायफल आणि 3 बॅग जप्त केल्या आहेत. भारतीय लष्कराने या ऑपरेशनला ऑपरेशन असार असे नाव दिले आहे.