राजकीय

ठाकरे गट सांगतो…

राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. पण पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये हा कुठला न्याय? त्यामुळे राज्यातील भगिनींनी सध्या हे दीड हजार रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या दीड हजारमध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. 

लाडकी बहीण योजनेत अनेक अटी-शर्ती, नियम पार केल्यावर पदरात फक्त दीड हजार रुपये पडतील आणि हे पैसे नंतर मिळतच राहतील, याचीही गॅरंटी नाही. त्यामुळे हे सरकार विधानसभेत पराभूत होईल आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील, असा दावा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या टोळ्यांनी दीड हजार रुपयांत घरची चूल पेटवून दाखवावी, असे आव्हानही ठाकरे गटाने दिले आहे.

Related Articles

Back to top button