क्राईम

विद्याश्री सोलापुरात बहिणीच्या घरी आली…

सोलापूर (प्रतिनिधी) शेळगी परिसरातील मेहताब नगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही पटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उपडकीस आली.
विद्याश्री भीमराव भासगी (वय १७, मूळ रा. सलगर ता. अक्कलकोट, सध्या रा. मेहताबनगर शेळगी) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या मृतदेह घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळू‌न आला. 
विद्याश्री ही सलगर येथे राहणार असून ती आजारी असल्याने सोलापुरात बहिणीच्या घरी आली होती. सोमवारी घरात कोणी नसताना तिने हा प्रकार केला. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास फौजदार वेडे करीत आहेत.

Related Articles

Back to top button