खेळ
भावाचा नाद खुळा! ग्लेन फिलिप्सचा खतरनाक कॅच, विराटसह सगळेच शॉक

- न्यूझीलंड विरूद्ध सामन्यात आज टीम इंडियाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कारण टीम इंडियाचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यातल्या त्यात विराट कोहलीने जबरदस्त शॉर्ट खेळला होता. मात्र तितक्याच जबरदस्त ग्लेन फिलिप्सने त्याची कॅच पकडली. ग्लेनची ही फ्लाईंग कॅच पाहून आता अनुष्का शर्माने डोक्याला हात मारला आहे. कोहलीच्या या विकेटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
- खरे तर पाकिस्तानविरूद्ध कोहलीने दमदार विजयी शतक ठोकले होते. या शतकानंतर कोहली लयीत आला होता.त्यामुळे तो न्युझीलंडविरूद्ध चांगली खेळी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा धुळीस मिळाली.
- कोहली चांगलाच खेळत होता. त्याने मारलेला शॉट देखील खूपच छान होता. मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्लेन फिलिप्सने कॅच घेतली आहे. फिलिप्सने फ्लाइंग कॅच घेतली. ही कॅच अक्षरशः विराट बघत राहिला होता. इतकेच नाहीतर स्टेडियममध्ये बसलेल्या अनुष्काने देखील डोक्याला हात मारला.