क्राईम
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त

- केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी काही टवाळखोरांनी तिची छेड काढली. या प्रकाराने राज्यात संतापाची लाट उसळली असून केंद्रीयमंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नसतील, तर सामन्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
- या अत्याचाराच्या घटनेनंतर रक्षा खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत छेड काढणाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडून बसणार अशी भूमिका घेतली. अशातच या घटनेबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केले आहे, असे म्हणत या घटनेत काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
- पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, काही जणांना अटक केली आहे. उर्वरित लोकांना ही अटक होईल. परंतु त्यांनी अतिशय चुकीचे काम केले आहे. त्यांना अजिबात माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.