बिजनेस
ब्रेकिंग! होळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ

- सध्या सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यात आज होळीचा सण असल्यामुळे या शुभमुहूर्तावर अनेकजण सोन्या-चांदीची खरेदी करण्याकडे वळत आहेत. मात्र या सोन्याने आपल्या ग्राहकांना चांगलाच मोठा फटाका दिला आहे. कारण की, ऐन सणासुदीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
- गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ६०० रुपयांची वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात समान वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, जळगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे २२ कॅरेट सोन्याचा दर ८,१२० रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याचबरोबर, २४ कॅरेटसाठी हा दर ८,८५८ रुपये प्रति ग्रॅम आहे.