क्राईम
सोनं लपवण्यासाठी घेतली युट्यूबची मदत

- दुबईमधून सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात कन्नड सिनेमातील रान्या रावने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. रान्याने तस्करी करण्याची पद्धत कशी शिकली हे देखील पोलिसांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्याने तिच्या जबानीमध्ये सांगितले की, ती फोटोग्राफी आणि रियल इस्टेट बिझनेसच्या निमित्ताने दुबईमध्ये जात असे. आपण फक्त दुबईमध्येच नाही तर युरोप, अमेरिका आणि पश्चिम आशियाई देशांचाही दौरा केला आहे, असेही रान्याने या जबानीत सांगितले आहे.
- रान्या रावने पोलिसांना ती तस्करी कशी शिकली हे देखील सांगितले. सुरक्षा एजन्सीच्या कचाट्यातून कसे निसटायचे हे यूट्यूबवर सर्च केले होते. त्याचबरोबर सोनं कसे लपवायचे हे देखील यूट्यूबवरुनच शिकले होते.
- रान्याने सांगितले की, तिला दुबई विमानतळावरील टर्मिनल 3 च्या गेटने जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर बेंगळुरुमध्ये सोने डिलिव्हर करण्याची सूचना दिली होती. आपण पहिल्यांदाच दुबईमधून सोन्याची तस्करी केली होती. यापूर्वी असे कधीही केले नव्हते.
- मला ज्या व्यक्तीने विमानतळावर भेटायला बोलावले होते त्याची बोलण्याची पद्धत विदेशी व्यक्तीसारखी होती. मी पांढऱ्या गाऊनमध्ये विमानतळावर भेटेन असे त्या व्यक्तीने सांगितले होते. आम्ही विमानतळावर भेटलो. सुरक्षा तपासणीतून बाहेर पडल्यानंतर त्याने मला सोन्याची छडी दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
- मला प्लॅस्टिकच्या दोन पाकिटात सोनं देण्यात आले होते. मी ते विमानतळावरच फाडले. त्यानंतर विमानतळावरील टॉयलेटमध्ये जाऊन ते सोनं स्वत:च्या शरिराला चिकटवले. मी ती सोन्याची छडी माझ्या जिन्समध्ये तसेच बुटांमध्ये लपवली होती, असे ती म्हणाली.