क्राईम

चिमुकला किंचाळत राहिला, कुत्र्याने हात, मान आणि पाठीचे तोडले लचके

  • राज्यात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठया प्रमाणात वाढला आहे. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या वणी शहरातील सदाशिव नगर येथे भटक्या कुत्र्याने एका लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 
  • या व्हिडीओत दोन मुले एका गल्लीत सायकल खेळताना दिसत आहेत. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने एका मुलावर हला केला. कुत्र्याने आधी मुलाच्या हातावर चावा घेत त्याला खाली पाडले आणि त्यानंतर त्याच्या मानेवर पाठीवर चावा घेतला. संबंधित मुलगा जीवाच्या आकांताने ओरडून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता.
  • मात्र कुत्रा अधिक आक्रमकपणे हा हल्ला करत होता. हा सगळा प्रसंग एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

  • मुलाने आरडाओरड करून स्वतःला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करून जीव वाचवून पळून गेला. त्याचवेळी मुलाचा किंचाळण्याचा आवाज ऐकून काही महिलाही घराबाहेर आल्या.

Related Articles

Back to top button