क्राईम

ब्रेकिंग! दत्ता गाडेला जन्मठेपेची शिक्षा होणार?

  • पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्या प्रकरणी मोठी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला जन्मठेप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
  • काल पुणे पोलिसांनी गाडे याच्यावर आणखी ३ कलमांची वाढ केली आहे. यामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
  • पुणे पोलिसांनी गाडेवर पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115 (2) आणि 127(2) या कलमांची वाढ करण्यात आली आहे. हे अतिरिक्त कलम सिद्ध झाल्यास दत्ताला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे बोलले जात आहे.
  • काल पुणे क्राईम ब्रॉन्चने दत्ता गाडेवरील कलमांची वाढ केली. पोलिसांनी गाडेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2) (M), 115 (2) आणि 127(2) या ३ कलमांची वाढ केली. यातील 64(2) (M) हा कलम जर सिद्ध झाला, तर दत्ता गाडेला एकाच महिलेवर वांरवार बलात्कार या गुन्हाच्या अंतर्गत दहा वर्ष ते आजीव जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

Related Articles

Back to top button