ब्रेकिंग! दत्ता गाडेचे सगळे दावे खोटे ठरणार?

स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मूळचा शिरूरचा दत्ता गाडे याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मंगळवारी पहाटे त्याने २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले होते.पोलिसांनी गाडे याचा सविस्तर जबाब नोंदवला असून तपासादरम्यान त्याच्या दाव्यांची पडताळणी केली जाईल.
गाडे फरार असताना ज्यांनी त्याला मदत केली त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. आगारात लावलेल्या बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गाडे याला शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक होण्यापूर्वी तो तीन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसला होता.
गाडे याने स्वतःला बस कंडक्टर म्हणून ओळख करून देत फलटणला जाणारी बस पकडण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवले आणि बसमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार केले. मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही. ती स्वतः मला म्हटली, तेव्हा मी बसमध्ये आम्ही गेलो. साडेसात हजार रुपये तरुणीने घेतले, असे गाडे याने आपल्या वकिलांना सांगितले. त्याठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडे याने आपल्या वकिलांना दिली.
दोघांमध्ये पैशांचा वाद होता. त्यामुळे तरुणीने आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला. दरम्यान, आरोपी गाडे याची डीएनए फिंगरप्रिंटिंग करून बसमधून गोळा केलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळवून बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे डीएनए फिंगरप्रिंटिंग करून पोलिसांचे हाती महत्वाचे पुरावे लागतील. यातून गाडे याचे सगळे दावे खोटे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



