क्राईम
स्वारगेट प्रकरणात ट्विस्ट ; आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीचे सनसनीखेज सवाल

- स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून यातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
- त्यातच आता आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. माझा नवरा शेतीमाल विकण्यासाठी बाजारात गेला होता आणि घरी येण्यासाठी तो स्वारगेट येथील बस आगारात थांबला होता.
- जे काही झाले ते संमतीने झाले आहे, आमचा कायदा सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते पोलिसांनी समोर आणावे, अशी मागणी आरोपीच्या पत्नीने केली आहे.
- ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तरुणीने आरडाओरडा का केली नाही? तिचे कपडे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबडलेले दिसत आहे का? असा सवाल आरोपीच्या पत्नीने केला आहे.