राजकीय
शरद पवारांनी डाव टाकला

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीत अजितदादा विरुद्ध युगेंद्र पवार असा थेट सामना रंगणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना पाहायला मिळाला होता. यंदा पुन्हा बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना दिसणार आहे.
- युगेंद्र पवार यांना बी फॉर्म मिळाल्यानंतर बारामती मतदारसंघात छोट्या छोट्या सभा घेत आहेत. अजितदादा यांच्या विरोधात युगेंद्र पवारकडून कार्यकर्ता मेळावे घ्यायला सुरुवात झाली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी ग्राउंडवर्कला सुरुवात केली आहे. युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवा जुळव करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र यांचा प्रचारही सुरू केला आहे.