ब्रेकिंग! शरद पवार यांनी डाव टाकलाच
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली असून एकूण ४५ उमेदवारांना संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नावं वाचून दाखवली.
या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ये म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार महामुकाबला महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या बारामती मतदारसंघाच्या मैदानात शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.
अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. यामुळे येथे बात विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. आत्राम कुटुंबातील या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले आहे.