मनोरंजन
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली होती

- ‘छावा’ सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य जगासमोर आले आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिका अभिनेका अक्षय खन्नाने साकारली आहे. पण इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी भविष्यवाणी केली होती, जी अखेर खरी ठरली.
- छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले होते की, दख्खनवर राज्य करण्याची औरंगजेबाची जिद्द त्याच्या अपयशाचे कारण ठरेल. दख्खनचा ताबा मिळवण्यासाठी जेव्हा औरंगजेब औरंगाबाद येथे आला होता, तेव्हा महाराजांनी त्याच्या मुलीला पत्र लिहिले होते.
- महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. मुघल आणि मराठ्यांच्या युद्धात औरंगजेबचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत परतत असताना त्याचा मृत्यू झाला. लेखक विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दख्खनवर चार लाख प्राणी आणि पाच लाख सैनिकांसोबत आक्रमण केले होते. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकही किल्ला त्याला जिंकू दिला नाही.
- औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 1689 मध्ये संगमेश्वर येथे फितुरी करत त्यांना ताब्यात घेतले. महाराजांसमोर औरंगजेबाने एक प्रस्ताव ठेवला होता. सर्व किल्ला औरंगजेबाला द्यायचे आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करावा… पण महाराजांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर शत्रूने महाराजांचे प्राण घेतले.
- 3 मार्च 1707 रोजी दख्खनहून दिल्लीला परतत असताना औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृतदेह दिल्लीत नेण्यात आला नाही तर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात नेण्यात आला. औरंगजेबाला औरंगाबादच्या खुलदाबाद येथे शेख जैनुद्दीन साहिब, ज्यांना औरंगजेबाने गुरू मानले, यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आले.