बिजनेस
बिग ब्रेकिंग! दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा खुलासा

- रिझर्व्ह बँकेने आज दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत पुन्हा एक मोठी अपडेट दिली. नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर ९८.१८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या. मात्र ६,४७१ कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत, असा दावा बँकेने केला.
- बँकेने आज या नोटांबाबत अपडेट दिली. अजूनही दोन टक्के नोटा या लोकांकडेच असल्याचे बँकेने सांगितले.
- दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने घेतला होता. त्यानंतरही बाजारात ३.५६ लाख कोटी रुपये मुल्याच्या नोटा शिल्लक होत्या. आता २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यातील बऱ्याच नोटा इतर बँकेकडून रिझर्व बँकेकडे परत आल्या. मात्र अजूनही ६४७१ कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. या नोटांचे मूल्य बाद झाले तरी, त्या नोटा काही जणांकडे शिल्लक आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.