मनोरंजन
एकेकाळी वडापाव विकले, स्टुडिओ साफ केला, आता बनवला चारशे कोटींचा चित्रपट

- छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘छावा’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. तरीदेखील त्याच्या कमाईचा वेग कमी झालेला नसल्याचे समोर येत आहे. छावाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. पंधरा दिवसात छावाने चारशे कोटींचा टप्पा पार केला आहे.
- मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. छावा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे. छावा चित्रपट दररोज करोडो रुपयांची कमाई करत आहे. ‘छावा’ने आतापर्यंत त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त कमाई केली आहे. ‘छावा’ने प्रदर्शनाच्या पंधराव्या दिवशी चारशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘छावा’ ने १५ दिवसांत एकूण ४१२.५० कोटी रुपये एवढी कमाई केली आहे.
- दरम्यान उतेकर यांनी पहिल्या काळात खूप अडचणींचा सामना केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात अक्षरशः वडापावदेखील विकले आहेत. स्वतः चा दिवसाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.परंतु ते या सर्व प्रवासात अनेक गोष्टी शिकले.
- फिल्म स्टुडिओमध्ये वेगवेगळी कामे करताना त्यांनी मोठ्या लोकांना आपल्यासमोर काम करताना बघितले. त्यांच्यासोबत राहून शिकले. या सगळ्याचा त्यांना भविष्यात खूप फायदा झाला. त्यांनी आज चारशे कोटींचा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.