राजकीय
एक मिनिटं… पुण्यात असताना बीडचे प्रश्न कशाला…

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल 1500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यासंदर्भात माध्यमांनी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारताच त्या संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती नाही. हे सर्व गृह खात्याच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे त्यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे. मात्र, या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे आणि त्याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांकडून बीड प्रकरणावर वारंवार प्रश्न विचारण्यात येत असल्याने पंकजा यांचा संयम सुटला. त्यांनी पत्रकारांना सुनावत म्हटले, मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात, मग पुण्यातील प्रश्न विचारा!