सोलापूर

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे, प्रथमोपचार पेटी व एनर्जी ड्रिंक

  • सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे, प्रथमोपचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक देण्यात आले.
  • वेदमूर्ती राजशेखर स्वामी (आहेरवाडीकर) यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेचे यंदाचे 50 वे वर्ष आहे. जवळपास 1000 सदभक्त एक महिनाभर या पदयात्रेत सहभागी होतात.
  •   पदयात्रेतील भक्तांना उन्हाळ्यामुळे किरकोळ आजार उद्भवतात. तसेच पायी चालून जखमा होतात. त्यांना पदयात्रेच्या मार्गामध्ये वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होवू शकत नाही. अशावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीरशैव व्हिजनच्या वतीने 11 हजार रुपयांची औषधे, प्रथमोचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक देण्यात आले. मागील 15 वर्षापासून ही सेवा बजावण्यात येत आहे. या उपक्रमासाठी डॉ. संजय कळके, डॉ अजित दुलंगे व वैदयकीय प्रतिनिधी रवींद्र आमणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
  •     कुंभार वेस येथील श्री रेवणसिद्धाश्रम मठ येथून यंदाच्या पदयात्रेचे शुक्रवारी सकाळी प्रस्थान झाले. त्यावेळी यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैल स्वामी (आहेरवाडीकर) यांच्याकडे वीरशैव व्हिजनचे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सुरेश कंदगुळे, गंगाधर झुरळे, संतोष अंकद, बद्रीनाथ कोडगे-स्वामी यांच्या उपस्थितीत औषधे, प्रथमोपचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक सुपूर्द करण्यात आले.
  •  यावेळी संजय पारशेट्टी, गुरुनाथ होसाळे, सूर्यकांत रामशेट्टी, बाबासाहेब देशमुख, महेश स्वामी, रामचंद्र राजमाने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button