मनोरंजन
दारू पिऊन आले, सिनेमागृह फोडले

- सध्या सोलापूरसह अन्य भागात ‘छावा’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
- दरम्यान जालना जिल्ह्यात छावा चित्रपट पाहायला आलेल्या मद्यधुंद लोकांनी चक्क सिनेमागृहात तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरात एका सिनेमागृहात काही प्रेक्षक घुसले. त्यांना छावा हा चित्रपट विनामूल्य पाहायचा होता. मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी सिनेमागृहात घुसून थेट तोडफोड चालू केली.
- हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काल रात्री ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. रात्री साधारण साडे दहा वाजता मद्यधुंद लोकांनी सिनेमागृहात धुडगूस घालून तोडफोड केली.
- दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सिनेमागृहाद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामध्ये एक ज्ञात आरोपी असून एकूण सात जणांवर जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.