सोलापूर
फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी पाच कोटी दिले

शिंदे गटाबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार खूपच अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी गटातून बाहेर पडू शकतात. ते फुटू नयेत यासाठी या आमदारांना पुन्हा ५-५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे.
एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. खैरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खैरे आज माध्यमांशी संवाद साधत होते. शिवाजी महाराजांबाबत या सरकारला काही आस्था नाही. शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही. केवळ आमदार फुटू नये, याकडे यांचे लक्ष आहे. त्यांना खोके द्यायचे एवढेच काम सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही खोके दिले काही लोकांना. मात्र राज्याकडे लक्ष नाही, अशी टीका खैरे यांनी केली.