अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अपघात

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती दिली. सध्या प्रियांका ही हॉलिवूडपट ‘हेड्स ऑफ स्टेट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला आहे.
प्रियांका सोशल मीडियावर नेहमीच अक्टिव्ह असते. आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते. आपल्या कामाबद्दल आणि नव्या प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. दरम्यान सोशल मीडियावर प्रियांकाने आपल्या दुखापतीची माहिती दिली आहे. प्रियांकाने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटातील स्टंट दरम्यान ही दुखापत झाली असावी, असे म्हटले जात आहे.
‘हेड्स ऑफ स्टेट’ हा ॲक्शन चित्रपट आहे. यामध्ये प्रियांका ही खतरनाक ॲक्शन सीन्स आणि स्टंट करताना दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शॉटिंग दरम्यान ही दुखापत झाली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चेहऱ्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याचे दिसत आहे.