देश - विदेश

ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा मोठा निर्णय

  • भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता, तेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दल पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत होते. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर भारताच्या या कारवाईचे नाव ऑपरेशन सिंदूर आहे.
  • ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने दहा मेपर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एअर इंडियाने दहा मे रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ९ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यासोबतच इंडिगो एअरलाइन्सने १६० देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून दिल्ली विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या वेगवेगळ्या विमान कंपन्यांची २० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
  • कतार एअरवेजने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर म्हटले आहे की, ‘पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअरलाइन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राहील.

Related Articles

Back to top button