देश - विदेश
ब्रेकिंग! पिक्चर अभी बाकी है

- पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. आज भारतीय हवाई दलाने केलेल्या या धाडसी कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नेस्तनाबूत करण्यात आली. यामुळे हादरलेल्या पाकिस्तानला भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ‘अभी पिक्चर बाकी है…’ असे म्हणत पाकची चिंता आणखी वाढवली आहे.
- नरवणे यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे की, जर पाकिस्तानने भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यात अशाच प्रकारच्या आणखी कारवाया संभवतात. त्यांच्या “अभी पिक्चर बाकी है…” या वक्तव्याने पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेला एक अचूक आणि संयमित प्रतिसाद होता.



