खेळ
ब्रेकिंग! पाकिस्तानची लाज काढत भारताने विजयासह सेमी फायनल गाठली

- चॅम्पियन ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात आज भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत विजय मिळविला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहलीने चौकार मारत शतक झळकत टीम इंडियाला विजयही मिळवून दिला आहे. 242 धावांचे लक्ष्य भारताने 43 व्या षटकांत गाठले.
- कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व गिलने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागिदारी केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराटने 114 धावांची तिसऱ्या विकेट्साठी भागिदारी केली. या भागिदारीमुळे भारत सहज विजयाकडे गेला. हार्दिक पंड्याच्या रुपात भारताला चौथा झटका बसला. पण त्यानंतर विराटने फटकेबाजी करत विजय मिळवून दिला. कोहलीने 111 चेंडूत शतक झळकविले आहे. या खेळीत त्याने सात चौकार खेचले.
- दरम्यान प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार मोहम्मद रिजवान आणि रउफ यांनी डाव सावरला होता. यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान उभे करता आले. भारतीय गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी विकेट घेत धावसंख्येला ब्रेक लावला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना पूर्ण 50 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. 49.4 ओव्हर्समध्ये 241 धावा करता आल्या.