खेळ

सिक्स मारून विषय संपव…

  • चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुबईतील स्टेडिअममध्ये काल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘चेस मास्टर’विराट कोहलीने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली आणि टीम इंडियाला सहा गडी राखून विजय तर मिळवून दिलाच पण सेमी फायनलमध्येही नाव ऑलमोस्ट फायनल केले. मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जिंकण्यासाठी कमी धावा हव्या असल्यामुळे कोहलीचे शतक हुकते की काय, अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती.
  • 43 वे षटक सुरू झाले तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी चार धावा आणि विराटला शतकासाठी पाच धावांची गरज होती. फिरकीपटू खुशदिल शाहच्या पहिल्याच चेंडूवर एकेरी घेत विराटने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने सिंगल घेत विराटला स्ट्राईक परत दिला. त्यामुळे आता विजयासाठी फक्त दोन धावा आणि विराटला शतकासाठी चार धावा हव्या, असे समीकरण झाले.
  • याचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. खुद्द कोहलीलाही माहीत होते की, शतक काही दररोज होत नाही. तोही या शतकाची आतुरतेने वाट पाहत होता. पण या शतकासाठी तो एकटाच अधीर नव्हता. पॅव्हेलियनमध्ये उपस्थित कर्णधार रोहित शर्माही तितकाच बेचैन होता. त्याचवेळी कॅमेरामनने त्याच्यावर कॅमेरा फोकस केला, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहितने कोहलीला शानदार सिक्स मारत शतक पूर्ण करण्याचा इशारा दिला.
  • त्यानंतर विराटने 43 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खुशदिलच्या बॉलवर विजयी चौकार मारून टीम इंडियाला तर विजय मिळवून दिलाच शिवाय त्याने वनडेतील आपले 51 वे शतकही पूर्ण केले. या शानदार शतकाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे इशारा केला आणि म्हणाला… मी बोलले होतो.. मैं हूं ना.. रिलॅक्स ! ते पाहून रोहितच्या चेहऱ्यावरही हास्य आले.

Related Articles

Back to top button