राजकीय
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

- ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यांच्या याविधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
- 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक विधान गोऱ्हे यांनी केले आहे.
- दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम शिंदेंना दिले होते. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही विधान गोऱ्हे यांनी केले.