क्राईम

ब्रेकिंग! बीडमध्ये आणखी एक सरपंचाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. आताही एक धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातूनच आली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने बाईकस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील निरवट येथे घडली. या घटनेची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. तसेच परळीतील अवैध राख वाहतुकीचा मु्द्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील मिरवट फाटा याठिकाणी हा अपघात झाला. या अपघातात क्षीरसागर गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की टिप्परची धडक बसताच क्षीरसागर बाईकवरुन काही मीटर दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या बाईकचाही चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. क्षीरसागर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा खरंच अपघात होता की घात होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल.

Related Articles

Back to top button