महाराष्ट्र

ब्रेकिंग! ठाकरे गटाला राज्यभरात दणका

  • ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बोलताना म्हटले होते की, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत. तसेच आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्यही केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 
  • ठाकरे गटाच्या गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button