ब्रेकिंग! चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला

Admin
1 Min Read
  • चीनमध्ये कोरोनासारख्याच असलेल्या ह्युमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता भारतामध्येही याच विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. बंगळुरूतील एका आठ महिन्याच्या बाळाला HMPV विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान समोर आले आहे.
  •  आरोग्य विभागाने सांगितले की, एका खासगी रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीची चाचणी केली, तेव्हा तिला HMPV चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शासकीय स्तरावर मुलीची कोणतीही चाचणी आज सकाळपर्यंत झाली नाही. आता खासगी रुग्णालयाच्या अहवालानंतर शासकीय रुग्णालय आणि प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर यासंदर्भात अधिक स्पष्टता होईल.
  • आरोग्य मंत्रालयाच्या मते, हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, यामुळे विशेषत: सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात. 
Share This Article