मनोरंजन
छावा चित्रपटाबाबत भलतीच प्रतिक्रिया; स्वरा भास्करवर नेटकरी तुटून पडले

- छावा चित्रपटात संभाजी महाराजांचे शौर्य आणि मुघलांकडून झालेला त्यांचा छळ दाखवण्यात आला. हा छळ पाहून थिएटरमधून बाहेर पडणारे प्रेक्षक भावूक होत आहे. अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलयं. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सिनेमाबाबत ट्वीटकरून भाष्य केले आहे. स्वराने देशातील वाढत्या चेंगराचेंगरीच्या घटनांऐवजी चित्रपटाला महत्त्व दिल्याने समाजावर टीका केली आहे.
- जर समाज चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यंपेक्षा चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय, अशी टीका स्वराने केली.
- स्वराने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात तिने लिहिले की, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण, ते सोडून जो समाज काल्पनिक चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल किंवा संताप व्यक्त करत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय… चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न करता समाज ५०० वर्षांपूर्वीचेा सीन पाहून होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असे स्वराने म्हटले आहे.
- दरम्यान, स्वराचे हे ट्विट समोर येताच सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका युजरने तिच्या पोस्टला उत्तर देताना लिहिलं की, या चित्रपटात ताजमहाल आणि मुघल-ए-आझम सारख्या काल्पनिक प्रेमकथांपेक्षा धर्मांध मुघलांचा खरा इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यामुळं धर्मांतरित महिला नाराज आहे. तुम्ही औरंगजेबाने संभाजीराजेंना छळले नाही, हे सिध्द करा. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला काल्पनिक आणि औरंगजेबाच्या अत्याचारांना खोटे ठरवून तिने मराठ्यांचा सन्मान नाकारला, असे लिहिले आहे.