महाराष्ट्र
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटा अन् त्याची माळ…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक ट्वीट केले. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला. राहुल गांधींच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला. त्यामुळे भाजपसह महायुतीचे नेते आक्रमक झाले. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. दरम्यान, आता कालीचरण महाराज यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला.
त्यांना राहुल गांधींच्या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा. त्यांच्या मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला, अशा शब्दात कालीचरण महाराज यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींसारख्या मूर्ख माणसावर काय बोलायचे?, असा सवालही कालीचरण महाराजांनी केला.



