देश - विदेश

दगाबाज पाकिस्तानवर भारतीय सैन्याचा घातक वार

  1. पाकिस्तानने आपला स्वभाव आणि सवयीप्रमाणे दगाबाजी केली. पुंछच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्य चौक्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानच मोठ नुकसान झाले आहे. या गोळीबारात पाकिस्तानचे काही सैनिक जखमी झाले आहेत. त्यांच्या 4 ते 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान मागच्या आठवड्याभरापासून नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावण्यासाठी अलर्ट मोडवर आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक कारस्थानाला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
  2. पाकिस्तानकडून सातत्याने सुरु असलेल्या या कारस्थानांच्या पार्श्वभूमीवर आज जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हा एक उच्च स्तरीय समीक्षा बैठक करणार आहेत. या बैठकीला उप राज्यपालांशिवाय जम्मू-काश्मीरचे DGP नलिन प्रभात, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उच्च अधिकारी उपस्थित राहतील.
  3. सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कुठल्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सैन्याची जिवीतहानी झाली आहे.

Related Articles

Back to top button