महाराष्ट्र
ओ! दादा, जय श्री राम…चिमुकला जोरात ओरडला

- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. चुकेल त्याला तिथेच सुनावणाऱ्या, अधिकाऱ्यांची खरडपट्टी करणाऱ्या अजितदादा यांची दादागिरी नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे अजितदादा यांच्यासमोर आवाज काढायची हिंमत सहसा कोणी करत नाही. अशातच एका चिमुकल्याने अजितदादा यांच्यासमोर केलेल्या घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
- अजितदादा हे नेहमीच कार्यकर्ते, अधिकाऱ्यांच्या गर्दीत असतात. अजितदादा यांना भेटण्यासाठी लहानांपासून- वृद्धांपर्यंत सर्वच जण गर्दी करत असतात. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये अजितदादा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी गर्दी केली होती. याच गर्दीत एक चिमुकला आपल्या आई वडिलांसोबत अजितदादा यांच्या भेटीसाठी उभा होता. त्याने अजितदादा पवारांना पाहून अशी काही घोषणा दिली की सर्वजण पाहत राहिले. ओ! दादा जय श्री राम ही घोषणा ऐकून अजितदादा क्षणभर दचकले.
- पुणेरी स्पिक्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अजितदादांच्या पुढे सर्वच बिनधास्त असतात, असा कॅप्शन दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी चिमुकल्याच्या घोषणेने अजितदादा घाबरले, अशी टिप्पणी केली आहे तर काही जणांनी अजितदादांवर दादागिरी करणारा चिमुकला असे म्हणत त्याचे खास कौतुकही केले आहे.