राजकीय
ब्रेकिंग! माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण

- माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावले होते, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.
- तर दुसरीकडे ऋषीराज यांचे पुणे विमानतळावरून अपहरण झाले नसून ते फिरायला गेल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांकडून देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी देखील आपल्याकडे कोणतेही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याच बरोबर सावंत कुटुंबियांनी देखील याबाबत कोणतीच फिर्याद दिली नसल्याची ही माहिती पुढे येत आहे.